जळगाव जिल्हाजळगाव शहर

एसटी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या कार्यक्षेत्रात पसरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी एसटी बँकेचे संचालक योगराज पाटील हे होते. तर बँकेच्या सर्व संचालकांसह सर्व संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस मागील वर्षाचे प्रोसिडिंग वाचून खर्चास अनुमती मागण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र मागील खर्चाबाबत आपला आक्षेप नोंदवला. त्याचप्रमाणे एसटी पतसंस्थेचा विज बिल टेलिफोन बिल यासह इतर अनेक अवाजवी खर्चाच्या नोंदींवर आक्षेप घेण्यात आला. एसटी पतसंस्थेने केलेली नोकर भरती नियमबाह्य असून यामुळे पतसंस्था तोट्यात गेली असल्याचे सांगून सदर नोकर भरती रद्द करण्यात यावी असा ठराव कामगार सेनेचे गोपाळ पाटील यांनी मांडला. या ठरावास कष्टकरी जनसंघाचे शैलेश नन्नवरे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

त्याचप्रमाणे एसटी बँकेच्या व्याज मध्ये कपात करण्याबाबत, सभासद वर्गणी वाढविण्याबाबत, मीटिंग भत्ता वाढविण्याबाबत, विना जामीनदार कर्ज मिळण्याबाबत, सामूहिक विमा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली या संदर्भात संचालक मंडळाकडून आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनविण्याचे कबूल करण्यात आले.एसटी पतसंस्थेकडून कर्मचारी हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी अनिल सपकाळे सोपान सपकाळे मनोज सोनवणे किरण चव्हाण देवराम कोळी विनोद पाटील यांनी सोसायटीचे सचिव विक्रम सिंग पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. एकंदरीत बैठकीत गोंधळ वाढल्याने व घोषणाबाजी सुरू झाल्याने संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण बैठकीतून काढता पाय घेतला. आजपर्यंतच्या सर्व बैठकीतून सर्वाधिक गोंधळात पार पडलेली बैठक म्हणून ही वार्षिक सर्वसाधारण बैठक अत्यंत वादळी ठरली.

Related Articles

Back to top button