Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । सीबीएसई मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १०वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. येथील एल.एच.पाटील शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे एल.एच.पाटील शाळेची १०वी ची बॅच ही पहिलीच होती. यात २३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यामध्ये ३ विद्यार्थ्यांनी ९० %
पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहे.
प्रशांत भालेराव हा ९५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला आहे. तर कनैय्या बारी व विवेक वाघ हे ९० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय आले आहेत. व महेश बारी याने ८६ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे. तसेच तन्मयी पिंगळे ८४ आणि सौरभ वाघ याने ८२ टक्के गुण मिळवले आहे. या परीक्षेत शाळेचे एकूण २३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे एल.एच.पाटील शाळेची ही १०वी ची पहिलीच बॅच असून पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे.
शाळेचे संस्थापक एल.एच.पाटील, अध्यक्ष जितेंद्र पाटील, संचालक कुणाल राजपूत, दिव्यानी राजपूत, प्राचार्य शिल्पा मलारा व सर्व शिक्षकांनी प्रशांत भालेराव, कनैय्या बारी,विवेक वाघ,महेश बारी,तन्मयी पिंगळे व सौरभ वाघ यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.