मेहतर समाजातर्फे रामदेवजी पदयात्रा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । येथील मेहतर समाज बांधवांतर्फे बुधवारी सकाळी राधाकृष्ण मंगल कार्यालयसमोरील श्री रामदेवबाबा मंदिरातून रामदेव पदयात्रा रवाना झाली. सकाळी रामदेवबाबा यांची पूजा अर्चना आणि आरती करुन पदयात्रा मार्गस्थ झाली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी देखील भेट देवून पदयात्रेत सहभागींना शुभेच्छा दिल्या.
मेहतर समाजातर्फे दरवर्षी रामदेवजी पदयात्रा काढण्यात येते. यंदा पदयात्रेचे १५ वे वर्ष असून बुधवारी सकाळी रामदेवबाबा यांची पूजा करण्यात आली. यावेळी सुभाष हंसकर, राजू हंसकर, अशोक हंसकर, संजू तेजकर, अजय हंसकर, संजू सनकत आदी उपस्थित होते.
ही पदयात्रा जळगावहून निघाल्यानंतर ममुराबाद, धाानेरा, चोपडा, सेंधवा मध्यप्रदेश, जुलवानिया, गुजरी घाट, रतलाम,सैलाना, प्रतापगड, आवरी माताजी, सावलीयाजी, नाथद्वारा, राजसमन्द, केलवा, चारभुजा, देसुरी, नाडोल, पाली, जोधपूर, चोमू, डेचू, पोखरण रुणीचा मार्गे रामदेवरा ग्राम जाणार आहे. या पदयात्रेत रवी हंसकर, ईश्वर टाक, हर्षल तेजकर, अनिल ठाकरे, सोनू बागडे आदी समाज बांधव सहभागी झाले आहे. ही पदयात्रा पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लागणार असल्याचे रवी हंसकर यांनी सांगितले.