खुशखबर.. या आठवड्यातही सोने झाले स्वस्त, चांदीही 1500 रुपयांनी घसरली
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतीही गेल्या आठवड्यात खाली आल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सोन्याचे दागिने स्वस्तात खरेदी करू शकता. Gold Silver Rate Today
या आठवड्यात स्थानिक वायदे बाजारात MCX वर सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) 1/31 टक्क्यांची घसरण नोंद झाली आहे आणि सोने 50,107 रुपये स्तरावर बंद झाले आहे. गेल्या आठवड्यात हा भाव 50779 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किंमतीत 672 रुपये प्रति ग्रॅम तर चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 1544 रुपयांची घट झाली. डॉलर मजबूत होत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. दरम्यान, सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर करत नाही.
राज्यातील चार शहरांतील भाव :
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,840 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,600 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,870 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,8700 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी या आठवड्यात 54,767 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली, गेल्या आठवड्यात हाच भाव 56,427 रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 1660 रुपये घसरण नोंदवण्यात आली.