जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । जळगाव जिल्हात येत्या सोमवारपासून पुन्हा पाऊस पडणार आहे. जिल्हात सोमवार पासून म्हणजेच १८ तारखेपासून जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या ठवड्यापासून सुरू असलेला पावसाचा जाेर शुक्रवारी ओसरला. दाेन दिवसांच्या संततधार पावसानंतर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झाले.जिल्ह्यात जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा पावसाचा जाेर कायम हाेता. १५ दिवसामध्ये १४० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली अाहे. १ जूनपासून १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात २३२.४ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. १५ जुलै राेजी पहाटेपर्यंत जिल्ह्यात ७.५ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्याने चार दिवसानंतर सकाळी सूर्यदर्शन हाेऊ शकले. हवामान विभागाने १८ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा तर त्यानंतर जाेरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात जिल्ह्याचाही समावेश आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरीप हंगमाचे नियाेजन करावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. तर अनेक तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम असणार असून पुन्हा येणाऱ्या सोमवारी पाऊस पाहायला मिळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.