शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळचा ६९वा वर्धापन दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळ, जळगाव ही जळगाव शहरातील एक जुनी संस्था आहे. या संस्थेचा ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांचे हस्ते महर्षी याज्ञवल्क्यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना त्यांनी मंडळाची माहिती दिली यात त्यांनी सांगितले की, आपले मंडळाची स्थापना दि.१३/७/१९५३ रोजी करण्यात आली, हि संस्था आज एकोणसत्तर वर्षांची झाली आणि आजही तीचे काम हे निरंतर तसेच सुरु आहे. या एकोणसत्तर वर्षात मंडळाची उत्तरोत्तर प्रगतीच झाली .आजमितीस मंडळाचे असंख्य सभासद असून ,त्यातील बरेचशे एकमेकांच्या संपर्कात असतात. संस्था वर्षभरात करत असलेले उपक्रम ही त्यांनी सांगीतले, तसेच संस्थेचा प्रयत्न असतो की प्रत्येक सभासद हा मंडळाशी जुळला गेला पाहिजे यासाठी संपूर्ण कार्यकारी मंडळ समाजत संपर्क करीत असते असे त्यांनी उपस्थितीना सांगीतले कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. द.का.देवळे यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव श्री. संदिप कुळकर्णी यांनी मानले. या प्रसंगी उपाध्यक्ष – मिनाक्षी जोशी , अजय डोहोळे , सचिव – संदीप कुलकर्णी , कोषाध्यक्ष – दत्तात्रय देवळे , सदस्य – सुरेश भट , राजेश कुलकर्णी , उल्हास जोशी व शांताराम कुलकर्णी ,सुभाष कुलकर्णी , सौरभ कुलकर्णी यां सह समाज बांधव उपस्थित होते..