⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | Rain Alert : गिरणा धरणाचा साठा २४ तासांत २८ टक्के वाढला

Rain Alert : गिरणा धरणाचा साठा २४ तासांत २८ टक्के वाढला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाचा साठा २४ तासांत २८ टक्के वाढला आहे. ३४ टक्क्यांवर असलेला धरणाचा साठा मंगळवारी दुपारी ६२ टक्क्यांवर पोहोचला.हे जिल्ह्यासाठी वरदान ठरत असून

मंगळवारी सायंकाळी धरणात ३२१.७१४ दलघमी उपयुक्त तर ४०६.६१४ दलमघी एकूण साठा होता. सध्या ठेंगोडा धरणातून २२ हजार क्युसेक तर हरणबारी धरणातून ६ हजार असा एकूण २८ हजार क्युसेक विसर्ग गिरणा धरणात हाेत आहे. त्यामुळे गिरणा धरणाच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. एरवी सप्टेंबर, अाॅक्टाेबरमध्ये भरणारे गिरणा धरण यंदा जुलै महिन्यातच १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यातील हा विक्रम ठरेल. धरणाच्या जलसाठ्यात वेगाने वाढ होत असल्याने पाटबंधारे विभागही सतर्क झाला आहे.


गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसापासूून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सोमवारी चणकापूर धरणातून २३ हजार क्युसेक तर पुनदमधून ९ हजार असा ३२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू होता. त्यामुळे गिरणा धरणाचा जलसाठा २४ तासात झपाट्याने वाढला. गिरणा धरणात दर तासाला १३० दशलक्ष घनफूट आवक होत अाहे. त्यामुळे यंदाही गिरणा धरण सलग चौथ्यावर्षी शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच गिरणा धरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाला आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या दहा वर्षांच्या काळात एकदा गिरणा धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी धरणात सात टक्के मृतसाठा शिल्लक राहिला होता. २०२१ मध्ये हॅट््ट्रीक साधत गिरणा धरणाने शंभरी गाठली हाेती. गिरणा धरण आतापर्यंत ११ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा ते बाराव्यांदा भरण्याची आशा आहे. असाच पाऊस राहिल्यास जुलैमध्येच धरण १०० टक्के भरण्याचा विक्रम होईल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह