जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । राज्यात नेहमीच चर्चेत असलेले भाजप नेते किरीट सोमय्या नेहमी आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका करीत असतात. संजय राऊत आणि सोमय्या हे गणित तर कधीच जुळत नाही. राज्यात नुकतेच ठाकरे सरकार पायउतार होऊन शिंदे-भाजप सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली होती. टीकेला उत्तर देत बंडखोर आमदारांनी जोरदार संताप व्यक्त करीत आम्ही उद्धव ठाकरेंना मानतो आणि त्यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली होती. दरम्यान, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्या यांचे कान टोचले असून सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका टाळली आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नका अशी भूमिका घेतली आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरे हे आजही आमचे आदरणीय असून आजही त्यांनी आम्हाला बोलवावं, आम्ही जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुणी काहीही बोललं तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्याबाबतची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंबाबत किरीट सोमय्यांचा सूर बदलल्याचं दिसत आहे.करणं आज प्रसार माध्यमांशी बोलताना सोमैया यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका कारण टाळलं आहे.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मागील सरकारने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम केलं आहे. आता शिंदे-फडणवीस सरकार दुप्पट गतीने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. महाराष्ट्रात जे परिवर्तन झालं आहे, त्याला न्याय मिळेल आणि दुप्पट गतीने सरकार पुढे जाईल”