TATA मोटर्सच्या ‘या’ गाड्या आजपासून महागल्या ; जाणून घ्या कितीने वाढले
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । भारतातील आघाडीची प्रवासी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या कारच्या किमतीत सरासरी 0.55 टक्क्यांनी वाढ केली आहे. कारच्या वाढलेल्या किमती आजपासून म्हणजेच ९ जुलैपासून लागू झाल्या आहेत. Nexon, Punch, Safari, Harrier, Tiago, Altroz आणि Tigor सारख्या गाड्या आजपासून महागल्या आहेत.
इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे गाड्या महाग झाल्या
कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कारच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये कंपनीने आपल्या कारच्या किमतीत 1.1% वाढ केली होती आणि आता पुन्हा एकदा टाटाच्या गाड्या महाग झाल्या आहेत.
जून 2022 मध्ये टाटाने सुमारे 45,000 युनिट्सची विक्री केली होती. कारच्या विक्रीच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पहिला क्रमांक मारुतीने तर दुसरा क्रमांक ह्युंदाईने व्यापला होता. वर्ष-दर-वर्ष विक्रीच्या बाबतीत, टाटाच्या विक्रीत 87% ची प्रभावी वाढ दिसून आली. जून 2021 मध्ये, टाटाच्या 24,110 युनिट्सची विक्री झाली, तर जून 2022 मध्ये, कंपनीने 45,197 युनिट्सची विक्री केली.
टाटा मोटर्सने टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सर्वाधिक 14,295 युनिट्स विकल्या. SUV सेगमेंटमध्ये ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV होती. यानंतर टाटा पंचची विक्रीही खूप झाली. जून महिन्यात पंचच्या एकूण 10,414 युनिट्सची विक्री झाली. याशिवाय, Tata Altroz आणि Tata Tiago यांच्याकडे अनुक्रमे 5,363 आणि 5,310 युनिट्स आहेत. कार उत्पादक म्हणून टाटाची लोकप्रियता अलीकडच्या काळात खूप वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात टाटा मोटर्सने जागतिक विक्रीच्या संदर्भात 50% ची वाढ नोंदवली आहे. सध्या ही मारुती आणि ह्युंदाई नंतर देशातील तिसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे.