जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । मुळजी जेठा महाविद्यालयात उद्या प्रा. डॉ.सुरेश बर्नवाल यांचे आठवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानवतेसाठी योग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुळजी जेठा महाविद्यालयातील तत्वज्ञान विभाग आयोजित भारतीय दर्शनिक अनुसंधान परिषद नवी दिल्ली प्रायोजित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानवतेसाठी योग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापीठाचे योग विभागप्रमुख प्रा. डॉ.सुरेश बर्नवाल हे देणार आहेत. व्याख्यानाचे आयोजन शनिवार दि. ९ जुलै सकाळी १० वाजता नवीन कॉन्फरन्स हॉल, मू. जे. महाविद्यालय घेण्यात येणार आहे. या व्याखानाला सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहावे असे आवाहन योग विभागप्रमुख डॉ. राजकुमारी सिन्हा यांनी केले आहे.