जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । दुचाकी चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पोलिसांत देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दिवसेंनदिवस वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाली आहे. एमआयडीसी पोलिसात देखील दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे उघडीस आण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागली असून दोन दुचाकी चोरट्याला गजाआड केले आहे. त्यांच्याकडू तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. दरम्यान, त्यांच्याकडून अजून काही दुचाकी मिळून येण्याची शक्यता आहे.
निक्की नंदलाल मिश्रा रा.गांधी नगर भुसावळ व शुभम सुनील पाटील रा. शिरपूर कन्हाळा रोड घोडेपीर बाबा रोड जवळ भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या संशियत आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी शोध पथकांना हे दोघे संशयित आरोपी संशयित स्थितीत दिसून आल्याने त्यांची कसून चौकशी केली असता. या दुचाकी मिळून आल्या. दरम्यान, या दोघांना अटक कसून न्यायलयात हजर केले असता. तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील चौकशी आहे. त्यामुळे अजून काही दुचाकी मिळून येण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
दिवसेन दिवस वाढत असलेले गुन्हे लक्षात घेत पोलीस प्रशासनाने शोध पथक तयार केले आहे. तसेच एमआयडीसी पोस्टाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी देखील आनंद पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाडे, योगेश बारी, विकास सातदिवे, किशोर पाटील यांचे पथक तयार करून हे गुन्हे उघडीस आणण्यासाठी रवाना केले असताना ही कारवाई करण्यात आली.