जळगाव जिल्हा

हतनूरचे ३० दरवाजे उघडले ; तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे आज गुरुवारी सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हतनूरचे ३० दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 39200 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने (Jalgaon News) नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विदर्भ आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. हतनूर धरणाच्या उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते.

४२ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग
जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 39 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button