जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । गेल्या वर्षभरापासून खाद्य तेलाच्या किंमतींनी सामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले होते. मात्र खाद्य तेलाच्या किंमती सध्या घसरत असल्याची दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसतोय. दरम्यान, खाद्यतेलाचे दर येत्या दीड ते दोन महिन्यांत आणखी घसरण्याची शक्यता आहे. Edible oil will soon become cheaper
कोरोना काळात खाद्य तेलाचे दर प्रचंड वाढले. गेल्या वर्षीच्या शेवटी खाद्य तेलाचे काहीशी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले होते. त्यातच इंडाेनेशियाने केलेल्या निर्यातबंदीमुळे पामतेलाची आयात बंद झाली होती. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले होते.त्यावेळी खाद्यतेल जवळपास १८० ते १९० रुपयांवर गेले होते. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले होते.
मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी इंडाेनेशियाने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय माघे घेतल्याने भारतीय बाजारपेठेतील सर्वच खाद्यतेलाचे दर कमी हाेण्याला सुरूवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल दरात घट होत असून इंडोनेशियाने पामतेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही बाबींमुळे येत्या काळात पामतेलाच्या दरात घट होताना दिसेल. त्याचे परिणाम अन्य सर्वच तेलांवर होतील, अशी चिन्हे आहेत’.
भारत हा खाद्यतेल आयात करणारा जगातील सर्वांत मोठा देश असून एकूण गरजेच्या ६० ते ६५ टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये पामतेल सर्वाधिक प्रमाणात आयात होते. इंडोनेशिया व त्यापाठोपाठ मलेशियातून या तेलाची निर्यात होते. त्यापाठोपाठ देशात सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाची आयात होते. पामतेलाचा वापर रेस्टॉरंट, हॉटेल व विविध खाद्यान्न स्टॉल्सधारकांकडून सर्वाधिक होतो. या स्थितीत आयात पामतेलाच्या दरात सुमारे २२ टक्के घट झाली आहे. तसेच मलेशियाने पामतेलाच्या निर्यातदरात सुमारे १२ टक्के घट केली आहे. त्यामुळे सध्या उच्चांकावर गेलेले देशांतर्गत खाद्यतेलाचे दर आता हळूहळू घसरण्याची आशा निर्माण झाली आहे.
सध्याचे खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर रुपये)
पाम -१२५-१३५
सोयाबीन १४५-१५०
सूर्यफूल १५५-१६०
शेंगदाणा १७५-१९५
राईसब्रान १४०-१४५