जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे होमिओपॅथीक गोदावरीयन्सचा आम्हाला यांचा अभिमान आहे. कोविडकाळातही आर्सेनिक अल्बमने अनेकांना तारले तर ज्यावेळी शासनाने रुग्णालय अधिगृहित केले त्यावेळीही होमिओपॅथीक महाविद्यालयाची खंबीर साथ लाभली, या सर्वांबद्दल गोदावरीयन्सचे मी अभिनंदन करतो. असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ च्या बॅचची दि.२ जुलै रोजी फ्रेशर्स पार्टी जल्लोषात झाली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हास पाटील बोलत होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गीतगायन, नृत्याचे सादरीकरण, शेरो-शायरी अशा विविध उपक्रमांनी पार्टीत रंग भरला. गोदावर फाऊंडेशनच्या केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित फे्रशर्स पार्टीप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांची उपस्थीती होती. सर्वप्रथम धन्वंतरी देवतेसह सेमुअॅल हेरीमनी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्याहस्ते पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. कथ्थक नृत्याद्वारे गणेश वंदना विद्यार्थीनीने सादर केली.
यावेळी प्रतीक्षा लावांगे हिने प्रास्ताविक केले. यावेळी इंटर्न प्रभासिनी सोनवणे हिने डीयुपीएमसीबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.कल्पना नागुलकर, आयुर्वेदचे प्राचार्य डॉ.बोरोले, डॉ.आरती शिलाहार, डॉ.विपुल विपुल शिलाहार आदिंची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा वाघ, वैशाली पांचाळ यांनी केले.
पुरस्काराने सन्मानित
डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयातील वराडे महेश, नायक रोहित, महाजन मयुर, बडगुजर वसंत, ठाकूर राशी, तेंडूलकर शितल, रावस साक्षी, पाटील आरती, तायडे प्रेरणा, कदम अंकिता, पाटील मानसी, गडेकर गंगासागर, जैस्वाल नम्रता, सोनवणे कमलेश, मेमन आयेशा गूी, बन्सल वंशिका, पाटील अश्विनी, चौधरी प्रणव, वाघ समीक्षा, पाटील प्रसाद यांना पुरस्काराने ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.