पेट्रोल-डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढली, एटीएफ निर्यात शुल्कात वाढ ; जाणून घ्या काय होणार फायदा?
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । मागील गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. गेल्या महिन्यात केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होते. तेव्हापासून हे इंधन दर स्थिर असून दिलासा मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आज शुक्रवारी मोठे पाऊल उचलत पेट्रोल-डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. याशिवाय एटीएफ निर्यातीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
ही बातमी देशवासीयांसाठी चांगली असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाचा खर्च भागवण्यास मदत होईल. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नेपाळ-भूतानचे उत्पादन शुल्क तेच राहणार असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशात 50 टक्के पेट्रोल देणे आवश्यक
यासोबतच सरकारने पेट्रोल-डिझेल आणि एटीएफसह सर्व उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासाठी कंपन्यांना सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल. आयात केलेले तेल बाहेर पाठविण्यावर नियम लागू होईल. कंपन्यांना देशांतर्गत बाजारात 50 टक्के पेट्रोल आणि 30 टक्के डिझेल द्यावे लागेल. यामध्ये नेपाळ, भूतान या देशांना सूट देण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारात किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
एटीएफच्या किमती वाढल्याने दिलासा मिळण्याची आशा आहे
कच्च्या तेलाच्या निर्यातीवर प्रतिटन 23250 रुपये शुल्क लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एअरलाइन्स कंपन्यांना एटीएफच्या किमतीत दिलासा मिळण्याची आशा वाढली आहे. देशांतर्गत बाजारात साठा वाढल्याने किमती नियंत्रणात राहतील. शुक्रवारीही एटीएफच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही बोजा पडणार नाही. काही काळ कंपन्यांकडून सातत्याने निर्यात होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होऊन दरात उसळी आली.