⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | राष्ट्रीय | नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी : सुप्रीम कोर्ट

नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी : सुप्रीम कोर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या विवादास्पद वक्तव्यांमुळे देश पेटला होता. ज्याची धग अजूनही कायम आहे. म्हणून त्यांनी माफी मागावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

उदयपूर येथील क्रूर घटनेने देश हादरून गेला. यातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमिवर, एका याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, नुपूर शर्मा यांनी माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली आहे, परंतु अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

शर्मा या एका पक्षाच्या प्रवक्ता आहेत, त्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शर्मांच्या वक्तव्यांमुळे उडालेला आगडोंब पाहता नुपूर शर्मा यांनी आता देशाची माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह