नव्या सरकारमध्ये नाशिकचे नवे पालकमंत्री कोण असणार? जळगावचा ‘हा’ आमदार आघाडीवर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । राज्यात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्या युतीचे सरकार येणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून मोठा बॉम्ब फोडला. या सरकारमध्ये मी कोणताही मंत्री नसेन पण भाजपचे आमदार मंत्रिमंडळाची शपथ घेतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी साडे सात वाजेला शपथ घेणार आहेत.
यादरम्यान एक चर्चा प्रचंड रंगताना दिसते आहे, ती म्हणजे नाशिकचे नवे पालकमंत्री कोण असणार? महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होती. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर कालच उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. महाविकास आघाडी असो किंवा युती सरकार असो. यामध्ये ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार नाशिक जिल्हात आहेत, त्याच पक्षाचा पालकमंत्री निवडला जातो. मात्र, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शेजारच्या जिल्हातील देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू गिरीष महाजन यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे.
जर नाशिकचा पालकमंत्री आयात न करता जिल्हातीलच आमदाराला संधी मिळाली तर भाजपाचे जिल्हात एकून पाच आमदार, शिवसेनेचे दोन आमदार आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे सुहास कांदे आणि भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ राहुल आहेर, दिलीप बोरसे, दादा भुसे यांनाही पालकमंत्री पदासाठी संधी मिळू शकते. मात्र, मंत्रीपद कोणाच्या वाट्याला येते हे महत्वाचे राहणार आहे. पालकमंत्र्याच्या रेसमध्ये सध्यातरी गिरीष महाजन यांचे नाव पुढे आहे, जर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने आयात पालकमंत्र्यांला विरोध केलातर जिल्हातील आमदारांना संधी मिळू शकते.