जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । महागाईने सर्वसामान्यांच्या नाकात दम केल्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई अजून वाढणार आहे. यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे. कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरची किंमत ही 78. 85 रुपयाला पोहोचली आहे. येत्या काळात 80 रुपयांपर्यंत कृपया घसरेल असा अंदाज आहे. यामुळे आता भारतात पुन्हा महागाई वाढणार असून इंधनाच्या किमतीतही वाढ होणार आहे. असे म्हटले जात आहे.
पेट्रोल डिझेल भारत आखाती देशाकडून 80 टक्के आयात करतो. आखाती देशांवर भारत पेट्रोल डिझेलसाठी अवलंबून आहे. यामुळे भारताच्या सरकारी कंपन्या डॉलर मध्येच कच्चे तेल खरेदी करतात. यामुळे आता पुन्हा पेट्रोल डिझेल वाढणार असे म्हटले जात आहे.
इंटरबँक करन्सी एक्सचेंज मार्केटमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत 15 पैशांनी घसरला आणि 78.51 रुपयांवर उघडला. परंतु, परदेशी गुंतवणुकदारांनी जोरदार विक्री सुरु केल्याने रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परिणामी महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. त्यातच रुपयाने पटकी खाल्याने आणि तो याही पेक्षा खालच्या अंगाला घसरणार असल्याने सरकारपुढे महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
खाद्यतेलाचे भाव आधीपासूनच भडकलेले आहेत. आता डॉलर वाढल्याने पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील साहजिकच आहे. यामुळे आयात खर्च देखील वाढेल. ज्यामुळे आता खाद्य तेलाचे भाव देखील वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ज्या ज्या गोष्टी भारतात इतर देशातून आयात करतो त्या सर्व गोष्टी येत्या काळात वाढेल असे म्हटले जात आहे. मोबाईल म्हणा, टीव्ही म्हणा, लॅपटॉप म्हणा, महागड्या कार आता अजून महाग होणार आहेत असे म्हटले जात आहे.