⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | गुन्हे | जळगावात दुचाकी चोरट्यांनी साधला षटकार, पोलिसांना ओपन चॅलेंज

जळगावात दुचाकी चोरट्यांनी साधला षटकार, पोलिसांना ओपन चॅलेंज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात दोन दिवसांपूर्वी पाच दुचाकी लंपास केल्याचा घटना घडली होती. ही घडना ताजी असताना पुन्हा जळगाव जिल्ह्यात सहा दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान चोरट्यांनी पुन्हा दुचाकी चोरीचा षटकार मारला असून थेट पोलिसांना चॅलेंज केल्याचे समजते. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विविध पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, प्रसन्न प्रफुल जैन (वय २७ रा. बिल्डिंग व भिकमचंद नगर जळगाव), बबलू खान रजमान खान (वय २४ रा. नवग्रह मंदिरा जवळ खरगोण जि. खोरगन, दुचाकी चोरी चोपडा), भूषण सुनील राऊत (वय २६ रा. पिंप्राळा जळगाव ), सागर प्रवीण केले (वय २८ रा. देशमुखवाडा जुने नगरपालिकेजवळ चाळीसगाव), सतीश अशोक पवार (वय २९ रा. भिलाली ता. पारोळा) व अनुप विश्वनाथ डंबेलकर (वय ३५ रा. विकास कॉलनी भुसावळ) या सहा जणांच्या दुचाकी अज्ञात भामट्यानी चोरून नेली. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत तक्रार दाखल असून पुढील तपास त्या त्या पोस्टातील पोलीस करत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पारोळा तालुक्यातील सार्वे येथे वास्तव्यास असलेले वीरेंद्र अशोक पाटील (वय २१), सचिन दिलीप गुंजाळ (वय ३२ रा.रामवाडी ता. चाळीसगाव), एकनाथ लहू लोणे (वय ४० रा.इच्छापूर ता. मुक्ताईनगर ), रमेश वाघ ( वय ५० रा. पिंपळगाव ता. पाचोरा ) व रिजवान सौदागर (वय ३२ रा. सोनार गली पाचोरा ) यांच्या दुचाकी चोरून नेल्या होत्या.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह