⁠ 
बुधवार, मे 1, 2024

मोठी बातमी : गुलाबराव पाटील आता बिन खात्याचे मंत्री

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । ना. गुलाबराव पाटील आता बिन खात्याचे मंत्री झाले आहेत. करणं त्यांची खाती काढण्यात आली आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी हि मंत्रीपदे काढण्यात आली आहेत. असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात अली आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे देण्यात आले आहेत. दादा दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती सुनिल तटकरे, यांच्याकडे देण्यात आली आहेत.

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात केलेल्या आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे.आता या गटाला उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.