⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावची ३७८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलिताखाली येणार, १९ सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर

चाळीसगावची ३७८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलिताखाली येणार, १९ सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील १५ गावांना १९ सिमेंट बंधारे बांधकामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सांगवी व बहाळ येथे प्रत्येकी ३ तसेच चांभार्डी, दसेगाव, राजदेहरे, कुंझर, रांजणगाव, कळमडू, पिंपळवाढ म्हाळसा, पाटणा, दडपिंप्री, पिंपरखेड, खडकी, डोणदिगर, खराडी येथे प्रत्येकी १ असे एकूण १९ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम होणार आहे. यामुळे जवळपास ३७८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.

यासंदर्भातल्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत दि.११ मे २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा करत याबाबतची जून महिन्यातच ई-निविदा देखील प्रसिद्ध झाल्याने लवकरच सदर कामांना सुरुवात होणार आहे. विरोधी पक्षातील आमदार असूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह