Shivsena VS Shivsena : हॉटेलमध्ये पार्ट्या झोडताना संजय सावंतांना पक्ष दिसला नाही का? – दारकुंडे
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । हॉटेलमध्ये पार्ट्या झोडताना संजय सावंतांना पक्ष दिसला नाही का?असा सवाल बंडखोर नारसेवक नवनाथ दारकुंडे यांनी विचारला आहे. संजय सावंत हे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहे त्यांच्या जिल्हयातील पाचही आमदार मंत्री शिंदे गटात सामील झाले मग पक्षनेते त्यांचा राजीनामा घेणार आहे का? नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय सावंत राजीनामा देणार का? असे हि प्रश्न सावंत यांना दारकुंडेंनी विचारले आहेत.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुरुवारी सोशल मिडियाद्वारे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक पोस्ट शेअर केली होती. ‘शिवसेना बाळासाहेबांचीच असून डुप्लिकेटांची नाही’ असे त्यात त्यांनी म्हटले होते. जळगावातील अनेक शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटसवर ठेवली होती. जळगावात शुक्रवारी याच आशयाचे पोस्टर झळकले असून महात्मा गांधी मार्गावर दुभाजकांवर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. यावर संजय सावंत यांना नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
यावेळी ते म्हणाले कि, मी नवनाथ विश्वनाथ दारकुंडे नगरसेवक जळगाव महानगरपालिका आजच्या राजकीय घडामोडी वर एक प्रश्न विचारू ईच्छितो, संजय सावंत हे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहे त्यांच्या जिल्हयातील पाचही आमदार मंत्री शिंदे गटात सामील झाले मग पक्षनेते त्यांचा राजीनामा घेणार आहे का? नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय सावंत राजीनामा देणार का? जळगाव मध्ये ते बॅनरबाजी करताय मग ते आजपर्यंत कुठे गेले होते? एका खाजगी हॉटेल मध्ये बसुन ते पार्ट्या झोडतात तेव्हा त्यांना पक्ष दिसला नाही का? तरी माझी मागणी आहे की संजय सावंत यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा त्वरित राजीनामा द्यावा.
राज्यातील घडामोडींनी सर्वांना अवाक केले असून शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना असे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले जात असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे फलक लागले आहेत. जळगावात देखील पोस्टर झळकले असून शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही, अशा आशयाचे फलक जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लावले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील फलक झळकले आहेत. आता बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे हे एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आले आहेत.