⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयित आरोपी पळाला

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयित आरोपी पळाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । न्यायालयातून कारागृहात नेत असताना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना येथे घडली. सदर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील असून त्याने पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल शुक्रवार दि. २४ जून रोजी न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार, राकेश बारकू काळे, भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्‍यांनी आपल्या सोबत या चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले. त्यांना शासकीय वाहन नसल्यामुळे ते बसने न्यायालयात आले होते. तसेच ते अमळनेर बस स्थानकाकडे निघाले.

दरम्यान, बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू धोबी याने पोलिसांना झटका देऊन पळ काढला. यावेळी अनिल पवार व राकेश काळे यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी दादू धोबी हा पोलिसांना सापडला नाही.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह