जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । संजय राऊत यांनी आज वर्षा बंगल्यावर एक वादग्रत विधान केले. ते म्हणाले कि, आम्ही महाविकास आघाडी तोडायला तयार मात्र आमदारांनो मुंबईत येऊन हे सांगा, यामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले कि, हे वक्तव्य करण्यापूर्वी घटक पक्षांना विचारात घ्यायचे आवश्यक होते; असे म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपण विरोधात बसण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता शेवटचे आचके देत असल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही क्षणाला सरकार कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज दुपारीच शरद पवार यांनी आपल्या आमदारांना सरकार पडू शकते, असे सूचित केले होते. यानंतर सायंकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याच प्रकारचे संकेत दिले.
छगन भुजबळ म्हणाले की, संजय राऊत यांनी वेळ पडल्यास महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू असे वक्तव्य केले आहे. खरंतर त्यांनी असे वक्तव्य करणे आधी घटक पक्षांची सोबत चर्चा करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी असे केले नसल्याबद्दल भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रकार विरोधकांची भूमिका बजावणार असून आम्ही विरोधात बसण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.