वाणिज्य

महागाईपासून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ; खाद्यतेलासह पिठाच्या दरात कपात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईपासून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. खाद्यतेलाच्या दरात कपात झाल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आंतरराष्ट्रीय दरात झालेली कपात आणि सरकारच्या हस्तक्षेपामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर खाली येऊ लागले आहेत. अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जूनच्या सुरुवातीपासून देशभरात शेंगदाणा तेल वगळता पॅकेज केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 15-20 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

नवीन MRP स्टॉक लवकरच येईल
अदानी विल्मर आणि मदर डेअरीने गेल्या आठवड्यात विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या होत्या. गेल्या काही दिवसांत कंपन्यांनी दरात कपात केली होती. यादरम्यान, दोन्ही कंपन्यांनी सांगितले होते की नवीन एमआरपीसह स्टॉक लवकरच बाजारात येण्यास सुरुवात होईल.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पांडे म्हणाले की, सरकारी हस्तक्षेप आणि जागतिक विकासामुळे खाद्यतेलाच्या किमतीचा कल अतिशय सकारात्मक आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन टप्प्यात छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 43 छापे टाकण्यात आले,

पिठाचे भावही खाली आले
सुधांशू पांडे म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारतातही पिठाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. सरकारने उचललेल्या पावलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हावरील नियमनानंतर सरकार पिठाच्या किमतींवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button