जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । एकाच कुटुंबातील दोघा भावांसह आई, पत्नी आणि मुल असे एकूण तब्बल ९ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून या 9 जणांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
आत्महत्या केलेल कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं कर्मचाऱ्यांना संशय आला. तसेच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नसल्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नसल्याने ग्रामस्थांनी डॉक्टरांचे घर गाठले असता. ही धक्कादायक घटना उघडीस आली.
ही घटना सांगली जिल्हातल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावामध्ये घडलीय. म्हैसाळ गाव हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात आहे. मिरज तालुक्यापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आत्महत्या केलेले दोघेही सख्खे भाऊ आहे. म्हैसाळ गावातील अंबिकानगरमध्ये ही घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.