⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | बातम्या | जळगाव शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट !

जळगाव शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । पावसाळा सुरु झाला तरी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. जी झाली ती एका पावसात वाहून जातील. त्यामुळे थर्डपार्टी ऑडिट केल्याशिवाय काेणत्याही मक्तेदाराचे पेमेंट करू नका अशी मागणी आमदार सुरेश भाेळे यांनी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत केली. तर आमदारांना दरवर्षी पाच काेटी विकासनिधी मिळताे. त्यांनी आतापर्यंत एकदाही रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. ताे दिला असता तर चित्र वेगळे असते असे माजी महापाैर नितीन लढ्ढा म्हणाले.

आमदारांना मतदार संघाच्या विकासासाठी दरवर्षी पाच काेटींचा निधी मिळताे. पाच वर्षात २५ काेटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी मिळू शकले असते. परंतु, त्यांनी एकदाही रस्त्यांसाठी निधी दिला नाही. रस्त्यांऐवजीवजी ओपनस्पेसमवर पेव्हींग ब्लाॅक, हायमास्ट लावणे या कामासाठी दिला असे नितीन लढ्ढा म्हणाले. पावसाळा सुरु झाला तरी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. जी झाली ती एका पावसात वाहून जातील. त्यामुळे थर्डपार्टी ऑडिट केल्याशिवाय काेणत्याही मक्तेदाराचे पेमेंट करू नका अशी मागणी आमदार सुरेश भाेळे यांनी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत केली. तर आमदारांना दरवर्षी पाच काेटी विकासनिधी मिळताे. त्यांनी आतापर्यंत एकदाही रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. ताे दिला असता तर चित्र वेगळे असते असे माजी महापाैर नितीन लढ्ढा म्हणाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. त्यात लढ्ढा व भाेळे या दाेघांत जुगलबंदी रंगली. जळगावकर चार वर्षांपासून रस्ते, पाण्यासाठी निरंतर कष्ट घेत अाहेत. शहराच्या वाढीव वस्तीतमहापालिकेचे पाणी मिळत नाही. त्यांना आमच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची याेजना द्यावी का? पावसाळा सुरु हाेऊन देखील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून देत मक्तेदाराचे पेमेंट राेखण्याची मागणी आमदार भाेळे यांनी केली. एका व्यक्तीचा द्वेष करा पण त्याची झळ जनतेला पाेहचू देऊ नका! नालेसफाईत बुद्धिपुरस्सरपणे भेदभाव केला जात असल्याचा आराेपही त्यांनी केला.


author avatar
टीम जळगाव लाईव्ह