ओबीसी आरक्षण संदर्भात समता परिषदेचे निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा.बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोगाच्या मार्फत गठित केलेल्या समितीमार्फत ओबीसींची माहिती सॉफ्टवेअर द्वारे आडनाव नुसार संकलित न करता जातीनिहाय संकलित करण्यात यावी या मागणीचे निवेदन समता परिषद युवक आघाडीच्या वतीने देण्यात आले.
ओबीसी समाजासाठी आरक्षण टिकाव याकरिता शासनातर्फे एम्पेरिकल डाटा बनवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हा डाटा जातीनिहाय न घेता आडनावावरून घेतला जात आहे. याला ओबीसी समाजाने विरोध केलाय एक आडनाव अनेक जाती प्रवर्गात येते प्रत्येक जाती वर्गातील व्यक्तींची नावे घेताना परिवारातील किमान एक व्यक्तीचे जन्मदाखला एलसी चेक करून माहिती घ्यावी.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसी ची माहिती संकलित करण्यासाठी मा. बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेले एम्पिरिकल टाटा दररोज जाऊन ओबीसींचे खरी आर्थिक सामाजिक राजकीय स्थिती माहिती संकलन अपेक्षित होते परंतु असे कुठेही निदर्शनास येत नाही.
आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आडनाव नुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे अशाप्रकारे समस्त ओबीसी समाजाची फसवणूक होत आहे सॉफ्टवेअर व्दारे सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती माहिती जमा करणे म्हणजेच ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे.
याकरिता समर्पित आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे व तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असेदेखील निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, बारा बलुतेदार संघाचे मुकूंद मेटकर, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन धांडे, छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा सरचिटणीस नितीन महाजन, महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंके, महिला महानगराध्यक्ष भारती काळे, रामू सैनी, प्रकाश बाविस्कर, शैलेश परदेशी, मनोज महाजन, दिलीप पाटील, नाना पाटील, गोपाल सोनवणे, काशिनाथ भोई, गणेश महाजन, अतुल हराळ, गणेश कोळी, यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.