जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थीसह पालक दहावी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. विविध अहवालांनुसार उद्या म्हणजेच १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.
या पद्धतीने तपासा निकाल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.