जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । निमखेडी येथील १५ वर्षीय व अमळनेर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील निमखेडी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीय सह वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी सकाळी ८.३० वाजता संशयित आरोपी अर्जुन ईश्वर सपके रा. जैराबाद जळगाव, हा या अल्पवीयन मुलीस काही तरी आमिष देऊन फुसलावून पडून नेले. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी तालुका पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी सपके विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे. तर दुसऱ्या घटनेत अमळनेर येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीय सह वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी रात्री या अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने काही तरी कारणाने वळवून नेले या प्रकरणी येथील पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास प्रकाश साळुंखे करीत आहे.