जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर 10 वीचा निकाल (10th Result) कधी लागणार याकडे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा लागल्या आहेत. अशात 10 वी निकालाबाबत मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे 10 वीचा निकाल हा 15 जून 2022 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइटवर नवीन अपडेट्सची वाट पहा.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर काही दिवसात दहावीचा निकाल लागतो असा आपले कडे पहायला मिळतं. याही वर्षी बारावीचा निकालानंतर दहावीचा निकाल लागतो का आणि तो कधी असा पालकांसह विद्यार्थी प्रश्न करत आहेत. तर दहावीची पेपर तपासणी ही आता पुर्ण झाली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल हा लवकरच लागू शकतो. सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीवरून मंत्री अडकून आहेत. या निवडणूकीनंतर लगेच निकाल येऊ शकतो. तर 10 वीचा निकाल हा 15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑफिशियल माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइटवर नवीन अपडेट्सची मिळतील.