⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | राजकारण | विधानपरिषद निवडणूक : खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणूक : खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू होत्या, अखेर गुरुवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला. एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राज्यात येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंचे पुनर्वसन होणार आहि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना संधी देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना दिलेला शब्द पाळला असून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अर्ज भरताना एकनाथराव खडसे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह