जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाचा १२ वीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून पारोळ्याच्या आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुजाता चौधरी हिने उत्तुंग यश संपादित केले आहे. सुजाताने ८२.६७ टक्के गुण मिळविले असून संस्कृत विषयात १०० पैकी १०० मार्क मिळविले आहे.
कोरोना काळ संपल्यानंतर यंदा प्रथमच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामुळे निकाल कसे लागणार याची उत्कंठा अद्यापही विद्यार्थ्यांना लागून आहे. बारावीच्या निकालात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल ९३.२९ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
पारोळा येथील आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सुजाता प्रदीप चौधरी हिने १२ वीला उत्तुंग यश संपादित केले आहे. सुजाताला १२ वीला ८२.६७ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सुजाता विज्ञान विभागाची विद्यार्थिनी असून संस्कृत विषयात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तसेच बायोलॉजी विषयात ९४ गुण मिळाले आहेत. सुजाताच्या यशाबद्दल तिचे कुटुंबीय, शिक्षकवर्ग, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.