बातम्या

‘त्या’ लाचखोर फौजदाराची झाली पोलिस कोठडीत रवानगी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाखांचीलाच मेहुणबारे पोलीस ठाण्यातच स्वीकारणार्‍या फौजदाराला जळगाव एसीबीने गुरूवारी दुपारी दोन वाजता अटक केली होती. शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले (32, जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे) यास चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तक्रारदार यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात 29 मार्च रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले (32, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे) यांनी चार लाख 50 हजारांची मागणी केली होती. तडजोडी अंती एक लाख रूपये देण्याचे ठरविले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार खात्री करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवार, 2 जून रोजी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले याने 1 लाख रूपयांची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित आरोपी योगेश ढिकले याला जळगाव न्यायालयाचे न्या.डी.एन.खडके यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले. तपास पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Back to top button