⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा शहरात त्वरीत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी

सावदा शहरात त्वरीत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । सावदा शहरात दररोज वाढणारी रुग्ण संख्या बघता शहारासाठी सुमाते 5 – ते 10 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी सावदा शहर शिवसेनेतर्फे आ. चंद्रकांत पाटील यांना करण्यात आली आहे.

यात कोविंड रूग्णांकरिता आमदार निधीतून सावदा शहरात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर मतदार संघात सावदा हे एकमेव नगरपालिका असलेले शहर असून शहरात न.पा.क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही रुग्ण घरीच उपचार होत असतात. तर काही दवाखान्यात उपचार घेत असतात. नगरपालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत असून ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने आपण मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार असून सावदा शहरासाठी सावदा शहरातील रुग्णांकरीता आपल्या निधीतून किंवा इतर निधितून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्यात उपयुक्त ठरेल. तरी आपण येथील शिवसैनिकांच्या पत्राचा विचार करून शहरासाठी पाच ते दहा ऑक्सिजन सिलेंडर तत्काळ उपलब्ध करु द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख भरत वसंत नेहेते, उपतालुका प्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, शाम वसंत पाटील, तालुका क्षेत्र प्रमुख मिलींद सुरेश पाटील, सचिव शरद गिरधर भारबे, गौरव दिलीप भेरवा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.