Accident : चारचाकीचा दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । चारचाकी आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना दि. १ जून रोजी नशीराबाद गावानजीक महामार्गावर घडली होती. याप्रकरणी दि.३ रोजी नशिराबाद पोलिसांत अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
नशीराबाद येथे मोहिब्बुल हक मन्यार (वय ३९) हा वास्तव्यासअसून मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतो. मोहिब्बुल हा १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या एम.एच. १९ डी.एक्स ६२८६ क्रमाकांच्या दुचाकीने महामार्गाने जात असतांना महेंद्रा शोरुमजवळ त्याच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. या अपघातात मोहिब्बुल हा जखमी होवून त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले होते.
याप्रकरणी मोहिब्बुल याने शुक्रवार, ३ जून रोजी चारचाकी चालकाविरोधात नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन चारचाकीवरील अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.