जळगाव शहर

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : महापौरांनी शब्द पाळला, चिखलातून वाट तुडवलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । शहराची वाढीव वस्तीत असलेल्या ममुराबाद मार्गावर प्रभाग क्र. 2 मधील प्रजापतनगरच्या मागील बाजूला कुंभार समाज व पवननगर, रेल्वे सातखोल्या परिसरातील नागरिकांच्या सातत्याने नागरी समस्यांसंदर्भात तक्रारी होत्या. याबाबत मनपा प्रशासनाकडे गतवर्षी नागरिकांचे निवेदन, तसेच जळगाव लाईव्ह न्यूज’च्या’ माध्यमातून सदर कैफियत मांडली होती. या अनुषंगाने गतवर्षी जुलै महिन्यात महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी तातडीने भेट देऊन पावसामुळे असलेला कच्चा रस्ता हा प्रचंड खराब होऊन चिखलमय झाल्यामुळे निर्माण झालेली परिस्थितीचा आढावा घेत, पाहणी करीत परिसरातील नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणी समजावून घेतल्या होत्या व पाहणी प्रसंगी उपस्थित महानगरपालिकेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश ही दिले होते. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असल्याने परिसरातील रहिवाश्यांकडून आनंद व्यक्त होत आहे.

महापौरांकडून नागरिकांना मिळालेल्या आश्वासनाची पूर्ती झाली असून शहरातील प्रभाग क्र. 2 मधील प्रजापत नगर, कुंभार समाज व पवन नगर मध्ये गुरुवार, दि. 2 जून 2022 रोजी रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ जळगाव शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्रीताई सुनिल महाजन यांच्या हस्ते भूमीपूजन करुन करण्यात आला. परिसरातील रस्त्यांचे काम व्हावे, यासाठी परिसराचे स्थानिक नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी परिसरातील रहिवाश्यांनी महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केले.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक तथा माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, परिसराचे नगरसेवक किशोर रमेश बाविस्कर व नगरसेविका उज्वला किशोर बाविस्कर यांच्यासह नगरसेवक मनोज आहुजा, उमेश सोनवणे, हर्षल मावळे, लतामाई फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा अनिता कोळी, विनोद कोळी, बंटी गवळी, समाधान कुंभार, सचिन ठाकुर, विक्रम सोनवणे, संदीप पाटील, सुकलाल कुंभार, रामभाऊ, पांडुरंग तांदळे, विजय चौधरी, वसंत गवळी, प्रभाकर कुंभार, मनोज अटवाल, गणेश गाढवे, दिलीप हिवरकर, तांदूळकर, छोटू कुंभार, कुंभार समाज व गवळी समाज बांधव, पवन नगर परिसरातील नागरिक व रहिवासी उपस्थित होते.

वाढीव वस्तीचा भाग असल्याकारणाने मुख्य रस्त्यापासून हा परिसर जवळपास अर्धा किलोमीटर लांब आहे, परिसरातील रस्त्याचे डांबरीकरणाकरिता नागरिक व स्थानिक नगरसेवक किशोर बाविस्कार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या अनुषंगाने महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या महापालिका प्रशासनाकडे पाठपुराव्याने तेथील रस्ते कामांना मंजूरी मिळाली व त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचा कामाला अखेर सुरुवात झाली. महापौर या नात्याने तत्काळ या भागाला भेट देऊन आमच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन आम्हास आश्वासित केले. तसेच पावसाळ्यापूर्वी महापौरांनी आपला शब्द पाळला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, त्याबद्दल आम्ही अतिशय समाधानी आणि आनंदी आहोत, असे भावोद्गार यावेळी परिसरातील रहिवाश्यांकडून व्यक्त केले गेले.

Related Articles

Back to top button