⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भविष्यात शेतीमुळेच संर्वांगीण प्रगती – रजनिकांत श्रॉफ

भविष्यात शेतीमुळेच संर्वांगीण प्रगती – रजनिकांत श्रॉफ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२२ । भविष्यात शेतीमुळेच संर्वांगीण प्रगती आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश असून भारतात ७० टक्के लोक शेती आणि शेती निगडित व्यवसाय करत आहेत. ग्रामीण भागातील तरुण-तरुणी गाव सोडून शहारत जाऊ नका तर औद्योगिक शिक्षण घेऊन गावाकडेच शेतीमध्ये प्रगती करा व उद्योगामध्ये वळा. भविष्यात याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन यूपीएलचे चेअरमन रजनिकांत श्रॉफ यांनी केले.  

जैन हिल्स येथे १ ते ५ दरम्यान फाली आठवे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त दि.२ गुरुवारी रोजी पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सीओ संदीप सिंग, नानासाहेब दुरापे, व्हाईसचेअरमन सान्ड्रा श्रॉफ, डायरेक्टर अथांग जैन हे होते. गेल्या आठवर्षांपासून शेतकरी आणि कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी या ‘फाली’ संमलेनाचे आयोजन करण्यात येत असून यंदा महाराष्ट्र व गुजरात राज्यातील औद्योगिक १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांतून ८०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी ६७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांची मांडणी केली.

शेतीचा संस्कार रुजवण्याचा प्रयत्न

शेती हा केवळ व्यवसाय नाही. शेती हा मानवी जीवनाचा प्रमुख आधारआहे. पुढच्या पिढीत शेतीचा संस्कार रुजवणे आवश्यकआहे. यासाठी विद्यार्थ्यांचे हेच वय याेग्य आहे. या वयात त्यांना शेतीची आत्मीयता वाढली तर आयुष्यभर शेतीची नाळ तुटत नाही. पुढे जाऊन हे विद्यार्थी कृषीक्षेत्रातच माेलाचे याेगदान देऊ शकतात. या कार्यासाठी पुढे आलेल्या आठ कंपन्यांनी पाठबळ दिले आहे. या कार्याला चळवळ,सहज संस्काराचे रूप यावे हा प्रयत्न असल्याचे मत अशोक जैन यांनी व्यक्त केले.

इनोव्हेटिव्ह कृषी उपकरणांचे सादरीकरण

आधुनिक शेती, स्मार्ट शेतीसाठी उपकरणांची आवश्यकता असते. कमी वेळ, श्रमात शेतीचे विविध कामे करण्यात येतात. याबाबतची ६७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांची मांडणी पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी केलेली होती. ही उपकरणे विशेष आकर्षणाची ठरले त्यामध्ये स्मार्ट इरिगेशन, गवत तण काढणी यंत्र, भूइमुगाच्या शेंगा फोडण्याचे यंत्र, कोंबडीशिवाय अंडी उबविण्याचे तंत्र, रात्रीच्यावेळी शेतात सायरन व फ्लश लाईट, सेन्सार पद्धतीने इरिगेशन, पिकांना फवारा पद्धतीने अशा एक ना अनेक उपकरणांची मांडणी करण्यात आलेली होती.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह