⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महासभेतून : सुनील भाऊ तुम्ही सांभाळून रहा.. असे का म्हणाले नितीन लढ्ढा ?

महासभेतून : सुनील भाऊ तुम्ही सांभाळून रहा.. असे का म्हणाले नितीन लढ्ढा ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ३० मे २०२२ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत महिलांना मिळणाऱ्या पाच टक्के मालमत्ता करा वरील सुटीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर सर्व नगरसेवकांनी एकमत दाखवत संपूर्ण बहुमताने हा प्रस्ताव मान्य केला. भाजपातर्फे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी याबाबत महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. मात्र या महासभेला हा ठराव जेव्हा पटलावर आला त्यावेळी झालेल्या संभाषणामुळे संपूर्ण महासभेत एकच हशा पिकला.

तर झालं असं की, जळगाव शहर महानगरपालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त म्हणून विद्या गायकवाड या आयुक्त लाभल्या आहेत. विशेष योगायोग म्हणजे यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर या स्वतः जयश्री महाजन यादेखील महिलाच आहेत. अशावेळी त्यांनी जो ठराव महासभेच्या पटलावर आणला या ठरावाला नितीन लढ्ढा यांनी मिस्कील शब्दात मी पुरुष आहे म्हणून तुम्ही पुरुषांवर अन्याय करत आहात आणि मी पुरुषांची बाजू घेत आहे असा टोला लगावला. यामुळे आता या महासभेत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. त्यानंतर नितीन लढ्ढा यांनी स्वतः या ठरावास साठी महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांचे विशेष कौतुक केले.

त्यानंतर भाजपा नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी महासभेत हा ठराव प्रशासकीय ठराव म्हणून आणल्याबद्दल आयुक्त विद्या गायकवाड व महापौर जयश्री महाजन यांचे विशेष कौतुक केले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी यावर उत्तर दिले की 15 टक्के सूट मिळत असल्याने आता जळगाव शहरातील पुरुष आपापली प्रॉपर्टी त्यांच्या बायकांच्या नावे करतील अशी आशा आहे. यानंतर सुनील भाऊ तुम्ही सांभाळून राहा असे नितीन लढ्ढा म्हणाले आणि संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

यामुळे कितीही हास्यकल्लोळ झाला असला तरी हा ठराव जळगाव शहरातल्या महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठराव आहे. यामुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. जळगाव शहरात अजूनही कित्येक असे कुटुंब आहे ज्यात कुटुंबामध्ये महिलांना मानाचे स्थान नाही. मात्र या निर्णयामुळे त्यांना ते स्थान मिळणे अजून सोपे होणार आहे. यासाठी संपूर्ण जळगाव शहरातल्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या किंबहुना महिला महापौर व आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे असे मत ‘जळगाव लाईव्ह’ च्या संपूर्ण टीमचे आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह