जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । आशिया खंडातील सर्वात मोठी पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीची निवडणूक नुकतेच पार पडली. नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन आणि राम पवार यांची अधिकृतपणे निवड जाहीर करण्यात आली. संस्थेच्या आज झालेल्या बैठकीत ग.स.चे अध्यक्ष उदय पाटील आणि उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांच्यासह अन्य संचालकांच्या उपस्थितीत नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स.सोसायटीची निवडणूक नुकतेच पार पडली. बहुमताच्या जवळ असलेल्या सहकार गटाने मोठी खेळी खेळत लोकसहकारचे दोन सदस्य गळाला लावले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. ग.स.च्या अध्यक्षपदी उदय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी रविंद्र सोनवणे यांची निवड झाली होती. जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन स्वतः शिक्षिका असून स्वीकृत सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. सोबतच मराठा समाजातील जेष्ठ कार्यकर्ते राम पवार यांची देखील स्वीकृत सदस्य म्हणून निवड जाहीर झाली होती.
रविवारी ग.स.ची पहिलीच सभा पार पडली. सभेत नवनियुक्त स्वीकृत संचालक महापौर जयश्री महाजन आणि राम पवार यांचा सर्व संचालकांतर्फे सत्कार करण्यात आला. प्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सहकार गटाचे गटनेते अजबसिंग पाटील देखील उपस्थित होते.
पहा व्हिडीओ प्रक्षेपण :