⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | रेल्वे अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रेल्वे अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । धरणगाव येथून जवळच असलेल्या चावलखेडा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा आज अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मृत तरुण पिंप्री येथील एका लग्नसमारंभात आल्याचे कळाले असून त्यामुळे या समारंभावर शाेककळा पसरली हाेती.

शिरपूर तालुक्यातील हाेळनांथे येथील अनिल अरुण अहिरे (वय ३४) असे मृत युवकाचे नाव आहे. मृत अनिल हा लग्न समारंभानिमित्त पिंप्री येथे आला होता. दरम्यान रेल्वेने काही नातेवाइक येणार असल्याने तो त्यांना घेण्यासाठी स्थानकावर गेला होता. परंतु, नातेवाइकांना घेण्यासाठी गेला असता रेल्वेस्टेशनवर तरुणाचा अपघात झाला. मृत अहिरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व २ मुले असा परिवार आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा गावी शोकाकूल वातावरणात अनिल अहिरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह