⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

Sex Worker : स्वमर्जीने वेश्या व्यवसाय गुन्हा नाही पण .. सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । Sex Worker । सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसाया बाबद मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे स्वमर्जीने वेश्या व्यवसाय गुन्हा नाही पण वेश्यालय चालवणे गुन्हा असणार आहे. न्या. एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली तिन सदस्यांच्या खंडपीठातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्या. एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली तिन सदस्यांच्या खंडपीठाने वेश्या व्यवसायाबाबत एक महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. वयाची अठरा वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती आपल्या मर्जीने (sex worker) वेश्या व्यवसाय करू शकतो . तो गुन्हा मानला जाणार नाही असा निर्णय देण्यात आला आहे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Sex Worker वेश्या व्यवसाय हा एक पेशा आहे. एखादी प्रौढ व्यक्ती आपल्या मर्जीने वेश्या व्यवसायाचे काम करत असल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा व्यक्तीला अटक करुन पोलिसांनी त्रास देवू नये असे देखील न्यायालयाने पोलिसांना उद्देशून नमुद केले आहे. अनुच्छेद 21 नुसार सर्वांना सन्मानपुर्वक जीवन जगण्याचा मुलभूत अधिकार आहे. सेक्स वर्क बेकायदा नसले तरी वेश्यालय/कुंटणखाना चालवणे मात्र बेकायदा असल्याचे म्हटले आहे. या शिफारशीवर सुनावणीसाठी न्यायालयाने 27 जुलै ही पुढील तारीख निश्चीत केली असून या तारखेला केंद्र सरकारने उत्तर द्यायचे आहे.