अभिमानास्पद : १९ वर्षाच्या मराठी मुलाने एडिट केला केजीएफ २
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । दक्षिण भारतातली फिल्म ‘केजीएफ २” आता संपूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालत आहे. एखाद्या चित्रपटाला जर लोकांच्या मनात घर करायचं असेल तर त्या चित्रपटात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी या चित्रपटांमध्ये आहेत. एक्शन, ड्रामा, डायलॉग या सर्व गोष्टींनी या चित्रपटाला 2022 सालचा सर्वात मोठा चित्रपट बनवला आहे. मात्र या चित्रपटाचं इतका उत्कृष्ट एडिटिंग केलं तरी कोणी? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचे उत्तर आहे एका 19 वर्षाच्या तरुण मुलाने. ज्याचं नाव उज्ज्वल कुलकर्णी आहे.
19 वर्षाचा उज्वल कुलकर्णी जेने हि फिल्म एडिट केली आहे तो आधी शॉर्टफिल्म एडिट करायचा. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत अनिल यांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती. मात्र त्याची एक शॉर्ट फिल्म बघून त्याच्यावर प्रशांत अनिल फिदा झाले आणि त्याला एडिट करण्याची संधी दिली.
सर्वप्रथम प्रकाश अनिल यांनी उज्वल कुलकर्णी याला ट्रेलर एडिट कर असे सांगितले. त्याने हा ट्रेलर खूपच सुंदर एडिट केला. त्यानंतर प्रकाश यांनी उज्वल कुलकर्णी याला अख्खी फिल्म एडिट करण्याची संधी दिली. त्याच्या या कामामुळे प्रकाश खुश झाले असून स्वतः त्याचे कौतुक केले आहे.
उज्वल कुलकर्णी यांच्यासमोर कित्येक बडे एडिटर टक्कर देत होते. मात्र स्वतःच्या कामाने त्याने स्वतः किती खडखडाट आहे हे दाखवून दिल आहे. त्यांच्या या कामाची प्रशंसा संपूर्ण जगातून केली जात आहे.