जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल झाला.
रामेश्वर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी नातेवाईक व मैत्रिणीकडे तपास केला तर कुठेही आढळून आली नाही. पिडीत मुलीच्या वडीलांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.