⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | पाळधी विकासाे चेअरमनपदी गोकुळसिंग पाटील

पाळधी विकासाे चेअरमनपदी गोकुळसिंग पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । धरणगाव तालुक्यातील पाळधी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने चेअरमन व व्हा.चेअरमन यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी गोकुळसिंग पाटील यांची तर व्हा.चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांची निवड करण्यात आली आहे.

विविध कार्यकारी सहकारी साेसायटीच्या संचालकपदी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, रामदास पुंडलिक सपकाळे, शे.मजीद सत्तार, राजेंद्र झावरू चौधरी, गोपाळ शालिग्राम पाटील, वासुदेव पौलाद पाटील, भरत साहेबराव पाटील, नूतन नरेंद्र कुलकर्णी, सुनंदा कैलास धनगर, गोकुळसिंग प्रल्हाद पाटील, भावलाल गोविंदा ननवरे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. टी. नदवाड यांनी काम पाहिले. तर संस्थेचे सचिव अनिल पाटील आणि लिपीक पांडुरंग कुलकर्णी यांनी त्यांना सहकार्य केले. वि.का. साेसायटीची तसेच पदाधिकाऱ्यांच्या बिनविराेध निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह