⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पशुधनांवर डल्ला मारणाऱ्या संशयितांना मालेगावातुन अटक

पशुधनांवर डल्ला मारणाऱ्या संशयितांना मालेगावातुन अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । जिल्हात विविध खेड्यामध्ये रात्रीतून गुरे चोरून त्यांची कत्तल करणारे व पोलिसांना विविध २५ गुन्ह्यात फरार असलेल्या कुरेशी भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला मालेगाव येथून तर दुसऱ्याला अमळनेर बस स्थानकावरून ताब्यात घेतले.

जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने चारचाकीतून गुरे चोरणारे मालेगाव येथील मुख्य सूत्रधार रशीद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी (मूळ रा. कसाली मोहल्ला, अमळनेर) हे अमळनेरच्या चार गुन्ह्यांमध्ये वाँटेड होते. ते फरार असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट काढले होते. रशीद आणि शकील या गुन्ह्यांमधील मास्टर माईंड होते. रशीदने मालेगावला पाचव्यांदा विवाह केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे यांना मालेगाव येथे पाठवले. रशीद याला माळदे येथील गुलाब बाबा दर्गा परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. रशीदला खाक्या दाखवताच त्याने शकील २२ रोजी चोपडा येथून बसने मालेगाव येणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी अमळनेर बसस्थानकावर शकीलला ताब्यात घेतले. या दोघांना चोपडा न्यायालयाने २ दिवस पाेलिस काेठडी सुनावली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह