जळगाव शहर

युवासेनेचा सिनेटवर भगवा फडकवण्याचा निर्धार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आगामी सिनेट निवडणुकीत १० जागा निवडून आणून यंदा सिनेटवर भगवा फडकवण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या युवासेनेच्या बैठकीत करण्यात आला. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सभासद नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचेही आवाहनही बैठकीत करण्यात आले.

युवासेनेची अजिंठा शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी युवासेनेने या निवडणुकीचे नेतृत्व करावे, शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. युवासेना स्वबळावर या निवडणुका लढणार असून, विद्यापीठातील गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थी हिताच्या योजना, सुविधा राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे सदस्य मिलिंद साटम, युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, प्रदेश सहसचिव चैतन्य बनसोडे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सहसचिव विराज कावडिया यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवराज पाटील, पंकज गोरे, चंद्रकांत शर्मा, महानगरप्रमुख शरद तायडे, किशोर भोसले, युवती प्रमुख प्रियंका जोशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button