खडसेंनी महाविकास आघाडीत कितीही मीठ टाकण्याचा प्रयत्न केला तरीही…..
जळगाव लाईव्ह न्युज | २३ मे २०२२ | माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महाविकासआघाडी मध्ये कितीही मीठ टाकण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार एकत्र मिळून त्याला गोड करतील असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथराव खडसे यांना लगावला.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथराव खडसे यांची जुगलबंदी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ज्ञात आहे. गेल्या काही दिवसांपासून या जुगलबंदीला पुन्हा सुरुवात झाली आहे. एकनाथराव खडसे महाविकास आघडी मध्ये मीठ टाकण्याचे काम करत आहेत. असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर नुकताच लावला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे यांनी कितीही प्रयत्न केला तरी महाविकासआघाडत तो खडा त्यांना टाकता येणार नाही उलट पवार साहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊन या मिठाच्या खाडा गोड बनतील.
तर दुसरीकडे शिवसंपर्क अभियानामध्ये शिवसैनिकांना दिलेल्या माहितीबद्दल या पत्रकार परिषदेचे आयोजन सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये गुलाबराव पाटील यांनी विविध प्रश्नांवर हात घातला.
ओबीसी आरक्षणाबद्दल गुलाबराव पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा एकत्र येऊन ओबीसींना न्याय मिळवून देऊ. असे मी आवाहन करतो.
तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अमृत योजनेचे काम सुरू आहे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अमृत योजनेमुळे नागरिकांना त्रास होत जरी असला तरी याच्या फायदा त्यांना पुढे जाऊन होणार असल्याची ग्वाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिली.
शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही असा टोला नुकताच नारायण राणे यांनी लगावला होता यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, जे स्वतः बाळासाहेबांचे झाले नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये.