जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आकाश उर्फ अकी रविंद्र मराठे याच्या रविवारी रात्री एलसीबीच्या पथकाने गाडगे बाबा चौक, महाबळ येथून मुसक्या आवळल्या. पुढील तपासाकामी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे होळीच्या दिवशी सागर ओतारी रा.कासमवाडी या तरुणावर काही हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. काही दिवसांनी उपचार सुरु असताना मुंबई येथे ओतारीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी काही संशयितांना अटक देखील केली होती. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून आकाश उर्फ अंकी रविंद्र मराठे रा.तुकारामवाडी हा फरार होता.
एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आरोपीच्या शोधार्थ पथक नेमले होते. पथकातील कर्मचारी हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोलीस नाईक विजय शामराव पाटील, प्रीतम पाटील यांनी दि.२० मे रोजी महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकातून ताब्यात घेतले. पुढील चौकशीकामी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.