बातम्या

जळगाव शहरात केरीबॅगची विक्री कराल तर खबरदार : मनपा आयुक्त विद्या गायकवाड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ मे २०२२ | मनपा आयुक्त विदया गायकवाड यांची शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते,व इतर हॉकर्सची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आयुक्त यांनी सिंगल युज कॅरीबॅग वापरणे बंद करावे अन्यथा तुमच्या वर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. जळगाव शहरातील तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की यापुढे बाजारात येतांना कापडी पिशव्या घेऊन यावे अन्यथा व्यवसाय करणारे व नागरीकांना वर सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाईल असे हि सांगितले

विद्या गायकवाड जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी बसल्यापासून नवनवीन समाज प्रबोधन करणारे निर्णय घेत आहेत. नुकतेच त्यांनी जळगाव शहरामधून तब्बल पाच टन कॅरीबॅगचा साठा जप्त केला होता. यांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे विद्या गायकवाड यांनी आज घेतलेली ही बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे.

तर दुसरीकडे मनपा उपायुक्त पवन पाटील असताना देखील अशीच कारवाई केली होती मात्र त्यानंतर आरोग्य विभागामार्फत अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. पवन पाटलानं तर आरोग्य विभागाचा चार्ज हा श्याम गोसावी यांच्याकडे देण्यात आला मात्र कारवाई करणे यामध्ये गोसावी हे उदासीन दिसून आले. गेल्याच आठवड्यात विद्या गायकवाड आयुक्त झाल्यानंतर त्यांनी एक मोठी कारवाई केली होती मात्र यापूर्वीही या अशा कारवाया जळगाव शहरात होत राहतील अशी अपेक्षा जळगाव शहरातील नागरिक करत आहेत.

कॅरीबॅग मुळे निसर्गाची होणारी हानी ही सर्वश्रुत आहे यामुळे बहुतेक नागरी कॅरीबॅगचा वापर करत नाहीत मात्र जे नागरिक कॅरीबॅगचा वापर करतात अशांवर कारवाई करण्यात आली नव्हती विद्या गायकवाड यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची पूर्ण शहरांमध्ये स्तुती होत आहे.

Related Articles

Back to top button